मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात पालक गमावलेल्या बालकांना बेकायदेशीररित्या दत्तक घेतलं जात असल्याचं, किंवा त्यांची विक्री करायच्या प्रयत्न उघडकीला आले, तर संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचं महिला आणि बालविकास आयुक्तालयानं स्पष्ट केलं आहे.
अशा प्रकारच्या घटनांबाबत समाजमाध्यमांवर सुरु असलेल्या चर्चेची दखल घेत आयुक्तालयानं मदत क्रमांकही जारी केला आहे. अशा प्रकारचा कोणताही गैरप्रकार होताना आढळला तर नागरिकांनी एक शून्य नऊ आठ या क्रमांकावर किंवा सारा महाराष्ट्र या मुलांना दत्तक घेण्यासंदर्भातल्या अधिकृत यंत्रणेच्या ८ ३ २ ९ ० ४ १ ५ ३ १ या क्रमांकावर कळवावं असं आवाहनही बालकिवास आयुक्तालयानं केलं आहे.