नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तंत्रशिक्षण संस्था अर्थात आयआयटी प्रवेशासाठी आयोजित करण्यात येणारी जेईई मेन्स ही मे महिन्यात होणारी प्रवेश परीक्षा पुढं ढकलण्यात आली आहे,अशी माहिती केंद्रिय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटर संदेशांत दिली आहे.

या महिन्याच्या अखेरीस ही परीक्षा होणार होती.पुढील माहितीसाठी विद्यार्थ्यांनी एनटीएच्या संकेतस्थळाला वारंवार भेट द्यावी असं आवाहन निशंक यांनी केलं आहे.