नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने आतापर्यंत देशातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एकंदर १७ कोटी १५ लाख लसींचा मोफत पुरवठा केला आहे. यामध्ये वाया गेलेल्या लसीच्या मात्रांव्यातिरिक्त एकंदर १६ कोटी २६ लाख मात्रा आतापर्यंत वापरण्यात आल्या आहेत.

सध्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे मिळून यापैकी ८९ लाख लसींच्या मात्रा उपलब्ध असून,येत्या ३ दिवसात २८ लाख लसीच्या मात्रा वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.