नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार येत्या तीन दिवसांमधे देशभरातली राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना कोविड-१९ प्रतिबंधक लसींच्या ९ लाखपेक्षा जास्त मात्रांचा पुरवठा करणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितले आहे.
आत्तापर्यंत देशभरातली राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सुमारे १८ कोटी कोविड-१९ प्रतिबंधक लसींचा पुरवठा केला आहे. यात वाया गेलेल्या लसींचाही समावेश असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. आत्तापर्यंत पुरवलेल्या लसींपैकी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे एक कोटीपेक्षा जास्त लसींच्या मात्रा शिल्लक असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.