मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचा धोका जास्त असल्याचं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे. त्या अनुषगांनं लसीकरणाच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुणे जिल्ह्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. लहान मुलांच्या लसीकरणाचा विचार सुरू आहे.

मात्र यात कोणीही राजकारण करू नये, असं आवाहन त्यांनी केलं. विदर्भात लशींचा पुरवठा होत नाही, या आरोपांचं खंडन करताना ते म्हणाले, की विदर्भात लशींचा पर्याप्त पुरवठा सुरू आहे. या बाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणं झालं आहे.

कडक निर्बंधांत शेती कामांना आणि शेती विषयक खरेदीला वगळलं आहे. मराठा आरक्षणा बाबतीत बोलताना ते म्हणाले की, गरज पडल्यास एक दिवसाचं अधिवेशन बोलावू आणि सामोपचारानं हा प्रश्न सोडवू.