नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं असे आवाहन हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले आहे. आंदोलनाच्या ठिकाणी आणि तिथून ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव होतो आहे. अनेक खेडी आता कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी परिस्थिती समजून घ्यावी, आणि कोरोना चाचणी करण्यासाठी आपणहून पुढे यावे. असं मनोहरलाल खट्टर म्हणाले.