नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सहकारी बँका लवकरच रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली येणार आहेत. यासाठी आवश्यक कायद्यातील दुरुस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली.
प्रस्तावित बँक नियमन कायद्यानुसार रिझर्व्ह बँकेचे बँकिंग संदर्भातले दिशानिर्देश सहकारी बँकांना लागू होतील. तरप्रशासकीय अधिकार सहकार निबंधकांकडेच राहणार आहेत, अशी माहिती केंद्रीय माहिती आणिप्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग विषयकदिशानिर्देशांचे पालन करण्यासाठी सहकारी बँकांना पुरेसा वेळ दिला जाईल. तसेचत्यांचं लेखापरीक्षणही रिझर्व्ह बँकेच्या दिशानिर्देशांनुसार होणार आहे. कायद्यातल्यादुरुस्तीनंतर अडचणीत असलेल्या सहकारी बँकेच्या संचालक मंडळावरही रिझर्व्ह बँकेलानियंत्रण मिळवता येईल.