नवी दिल्ली : किंबर्ले प्रक्रिया बैठक येत्या 17 ते 21 जून दरम्यान मुंबईत होणार आहे. किंबर्ले प्रोसेस सर्टिफिकेशन स्किम केपीसीएस म्हणजे किंबर्ले प्रक्रिया प्रमाणन योजनेच्या विविध कार्यकारी गट आणि समित्यांच्या बैठकीबरोबरच डायमंड टर्मिनॉलॉजी आणि आर्टिसनल मायनिंग यावर दोन विशेष मंचावर चर्चा होईल. केंद्र सरकार आणि इतर सहभागी देशातले प्रतिनिधी, उद्योग आणि समाजातले सुमारे 300 प्रतिनिधी या पाच दिवसांच्या बैठकीला उपस्थित राहतील.

किंबर्ले प्रक्रिया प्रमाणन योजनेच्या संस्थापक सदस्यांपैकी भारत एक सदस्य आहे. 2019 या वर्षासाठी किंबर्ले प्रोसेसचा भारत अध्यक्ष तर रशिया उपाध्यक्ष आहे. विदेश व्यापार महासंचालनालयाचे महासंचालक आलोक वर्धन चतुर्वेदी हे या वर्षासाठी नियोजित अध्यक्ष आहेत.

केपीसीएसचे 55 सदस्य आहेत. 2003 पासून भारत केपीसीए प्रक्रियेत सक्रीय सहभागी आहेत.