नवी दिल्ली : मे महिन्यात घाऊक किंमतीवर आधारित चलनफुगवट्याच्या निर्देशांकात याआधीच्या महिन्याच्या तुलनेत 0.2 टक्के वाढ झाली.
मे महिन्यात हा दर 2.45 टक्के राहिला.
खाद्यान्न गटाच्या या निर्देशांकात कोणताही बदल झाला नाही. अखाद्य गटाच्या निर्देशांकात आधीच्या महिन्याच्या तुलनेत 0.9 टक्के वाढ झाली.
खनिज गटाच्या निर्देशांकात 4.2 टक्के घट झाली. तर इंधन आणि ऊर्जा या महत्त्वाच्या गटाच्या निर्देशांकात 0.6 टक्के वाढ झाली. उत्पादित वस्तू गटाच्या निर्देशांकात 0.1 टक्के वृद्धी झाली.