नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचं चार सदस्यांचं शिष्टमंडळ पाकिस्तानातल्या ननकाना साहेब इथं जाणार असल्याचं समितीचे अध्यक्ष गोविंद सिंग लोंगोवाल यांनी बातमीदारांना सांगितलं.
हे शिष्टमंडळ, ननकाना साहेब गुरुद्वारावर जमावानं केलेल्या हल्ल्यानंतरच्या तिथल्या परिस्थितीचा आढावा घेईल, तसंच तिथल्या शिख कुटुंबियांचीही भेट घेईल, या हल्ल्यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हल्ल्यातल्या दोषींवर पाकिस्तान सरकारनं कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी असून, या प्रकरणी आपण संयुक्त राष्ट्रांत दाद मागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.