नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यूरोपाच्या काही भागात अजूनही पूरस्थिती कायम आहे. पाऊस आणि पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत १८० लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. जर्मनी आणि बेल्जियमला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. या सर्व ठिकाणी मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू आहे.