नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीरियाच्या विरोधी पक्षाच्या ताब्यात असलेल्या इडिलिब प्रांतात सीरिया आणि तुर्कस्तान दरम्यान सुरु असलेला संघर्ष त्वरित थांबवावा, असं आवाहन संयुक्त राष्ट्रांचे महासचिव, अँटोनियो गुटेरस  यांनी केलं आहे.

काल बातमीदारांशी बोलताना ते म्हणाले, की या दोन देशांमधला हा संघर्ष लवकरच थांबायला हवा. दोन्ही देशाचे सैन्य एकमेकांवर बॉम्ब वर्षाव करत आहेत, हे जागतिक शांततेसाठी घातक आहे. या समस्येवर राजकीय मार्गाने तोडगा निघेल, सैन्याच्या बळावर तोडगा निघू शकत नाही, असंही ते म्हणाले.