मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळं रुगणांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलंय. स्मशानभूमीत मृतदेहांवर अग्निसंस्कार करताना धूर आणि राख मोठ्या प्रमाणात वातावरणात पसरत आहे.

हवा प्रदूषित होत असल्यानं स्मशानभूमी लगत राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञाचा अवलंब करावा असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

समशानभूमी परिसरातील या समस्येबाबत एका जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमुर्थी गिरीश कुलकर्णी यांनी मुंबईसह राज्यातल्या स्मशानभूमींसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, स्मशानभूमीतील चिमण्यांच्या उंची वाढवा असे आदेश न्यायालयाच्या खंडपीठानं पालिकांना दिले आहेत.