नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि उझबेकिस्तान यांचा दस्तलिक- २०१९ हा पहिला संयुक्त लष्करी सराव आजपासून ताश्कंद इथं चर्चिक प्रशिक्षण तळावर सुरू होत आहे. हा सराव १३ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि उझबेकिस्तानचे संरक्षणमंत्री मेजर जनरल बखोदिर निझामोविच कुर्बानोव्ह यांच्या उपस्थितीत या सरावाची रंगीत तालीम झाली. दहशतवाद प्रतिबंधक कारवायांवर या सरावाचा भर आहे.

या सरावामुळे भारत आणि उझबेकिस्तानच्या लष्कराला परस्परांच्या सर्वोत्तम डावपेचांची आणि अनुभवाची देवाणघेवाण करता येईल. लष्करी वैद्यकशास्त्र आणि लष्करी शिक्षण या क्षेत्रात दोन्ही देशांदरम्यान तीन सामंजस्य करार करण्यात आले आहेत.