नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाममध्ये एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदवहीच्या अंमलबजावणीचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी समर्थन केलं आहे. ते काल पोस्ट कलोनियल आसाम या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. एनआरसी हा भविष्यासाठी एक मूलभूत दस्तऐवेज आणि सुनियोजित चौकटीतला उपाय आहे, असं ते म्हणाले.

परस्पर सामंजस्यानं शांततापूर्ण सहअस्तित्व आणि समावेशक प्रगतीशील समाज निर्माण करण्यासाठी एनआरसी महत्त्वाची भूमिका बजावेल, असं त्यांनी सांगितलं. एनआरसीबाबत आपले आक्षेप नोंदवण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली.

अवैध स्थलांतरितांची संख्या निर्धारित करण्याची तातडीची गरज होती आणि ही गरज सध्या होत असलेल्या एनआरसीच्या अंमलबजावणीतून साध्य होत असल्याचं त्यांनी सांगितलं.