नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविशिल्ड या लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इनस्टीट्युटने भारतीय नागरिकांच्या लसीकरणाला नेहमीच प्राधान्य देण्याचा दृष्टीकोन ठेवला असून, संस्थेने भारतीयांना डावलून परदेशात कोविशिल्ड या लसीची निर्यात केलेली नाही असे स्पष्टीकरण सिरमचे प्रमुख आदर पूनावाला यांनी केले आहे.
ते पुढ म्हणाले की या लसीची निर्मिती करताना परदेशी संस्थेशी करार झाल्याने, त्यानुसार काही लसींची निर्यात करावी लागली. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात २ ते ३ महिन्यात सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण अशक्य असून, या मोहिमे समोर अनेक आव्हाने आणि समस्या आहेत. सर्व भारतीयांचं लसीकरण होण्यासाठी 2 ते 3 वर्षांचा कालावधी लागू शकतो. लसींच उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी सिरम कंपनी प्रयत्न करत असून, त्याच्या वितरणात भारतीयांना प्राथमिकता दिली जाईल तसेच या वर्षाच्या अखेर पर्यंत इतर देशांना लसीची निर्यात सुरू होऊ शकेल अशी माहिती ही पूनावाला यांनी यावेळी दिली.