पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांच्यावतीने पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आवाहन

पिंपरी : सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असून यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र या समस्यांची सोडवणूक कशी करता येईल? यासाठी मदत कशी व कुणाची घेता येईल? हा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त मा. श्री कृष्ण प्रकाश यांच्या संकल्पनेतून महासेतू सोल्युशन्स एलएलपी ग्लोबल हयुमन ऑरगनायझेशन यांच्या समन्वयातुन “पोलीस सॅमरिटन” या नावाने हेल्पलाइन दिनांक १७ मे २०२१ रोजी सुरू करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयामधील नागरिक खालील प्रकारच्या समस्यांसाठी हेल्पलाइनवर फोन करू शकतात.

१. पहिली समस्या म्हणजे कोविड सुसंगत आचरण ( Covid Appropriate Behavior) : यामध्ये कोविड पॉझिटिव्ह असताना सदर रुग्ण समाजामध्ये वावरत असेल अशा रुग्णांना होमक्वारंटाईन केले जाईल. नागरिक सामाजिक अंतराचे (Social Distance) पालन करत नसतील. नागरिक मुखपट्टीचा (Face Mask) वापर न करता वावरत असतील. ज्यांना परवानगी नाही अशा आस्थापना (दुकाने, हॉटेल्स) सुरू असतील. वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन करून आस्थापना सुरू असतील. अशा बाबतीत हेल्पलाइनवर तक्रार नोंदवू शकतात. या तक्रारींच्या अनुषंगाने पोलीस सदर व्यक्तीवर उचित कायदेशीर / दंडात्मक कारवाई करतील.

२. दुसरी समस्या म्हणजे नागरिकांची होणारी कोणतीही पिळवणूक उदाहरणार्थ :- कोरोना रुग्णांसाठी अँम्बुलन्स चालक अवाजवी दर आकारत असतील. Remdesivir, Tocilizumamb या किंवा इतर कोरोना प्रतिबंधक औषधांचा काळाबाजार होत असेल. कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अवाजवी पैशांची मागणी होत असेल. (मात्र रुग्णाला डिस्चार्ज देताना रुग्णालयाचे अंतिम देयकाबाबत च्या कोणतेही तक्रारीचा अंतर्भाव या हेल्पलाईन मध्ये केलेला नाही. हॉस्पिटल बिल बाबत कोणतीही तक्रार असल्यास कोविड बिल लेखा परीक्षण समिती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याशी संपर्क साधावा) आंतरजिल्हा / आंतरराज्य प्रवासासाठी बनावट पास बनवले जात असतील. बनावट कोरोना ( RTPCR / Rapid antigen report) अहवाल बनवले जात असतील अशा बाबतीत हेल्पलाइनवर तक्रार नोंदवू शकता. या तक्रारींच्या अनुषंगाने पोलीस विभागातर्फे उचित कायदेशीर / दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

३. तिसरी बाब म्हणजे मदतीची आवश्यकता असेल तर उदाहरणार्थ :- संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे Home Quarantine असल्यास औषध जेवण, भाजीपाला याची आवश्यकता असेल, कोरोनामुळे कोणताही शिशु अनाथ झाला असेल आणि त्याची जबाबदारी सांभाळण्यास कोणीही नसेल अशा प्रकारच्या मदतीसाठी नागरिक हेल्पलाईनवर मदत मागू शकतात.

४. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये अचानक रॅपिड एंटीजन तपासणीचे कॅम्प पोलीस सॅमरिटन्स व महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित करण्यात येतील. यामध्ये जे नागरिक करोना पॉझिटिव्ह आढळून येतील, त्यांना तात्काळ शासनाच्या कोविड केअर सेंटर मध्ये quarantine करण्यात येईल.

वरिल कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास नागरिकांनी खालील मोबाईल नंबरवर संपर्क करण्याचे मा. श्री कृष्ण प्रकाश पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी आवाहन केले आहे.

‘पोलीस सॅमरिटन” या हेल्पलाइनचे क्रमांक

८०१०४३०००७

८०१०८१०००७,

८०१०४६०००७

८०१०८३०००७

हे मोबाईल नंबर दिनांक १७ मे २०२१ पासून कार्यान्वित करण्यात आले आहेत.