नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये यावर्षी बोधगया इथं बुद्धपौर्णिमा उत्सव प्रतीकात्मकरित्या साजरा केला जाणार आहे. बोधगया इथलं जागतिक वारसा स्थळ महाबोधी महाविहार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 जूनपर्यंत बंद आहे. भगवान बुद्धांनी बोधगया इथल्या बोधी वृक्षाखाली आत्मज्ञान प्राप्त केले होते. यावर्षी महाविहार संकुलात कोणताही सामूहिक कार्यक्रम होणार नसल्याचं महाबोधी महाविहारचे प्रमुख भिक्खू चलिंडा यांनी म्हटलं आहे. आज सकाळी केवळ दहा भिक्षूंनी महाविहार इथं मंत्रांसह भगवान बुद्धाच्या प्रतिकृतीवर खिर आणि सिवारा अर्पण करत पुष्पवृष्टी आणि प्रार्थना केली. जगभरातील बौद्ध भक्तांसाठी महाविहारातील पूजा विधी फेसबुकवर उपलब्ध असतील.