नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या विषाणूचा नवा प्रकार व्हिएतनाममधे आढळला असल्याचं तिथले आरोग्य मंत्री गुयेन थान्ह लाँग यांनी काल जाहीर केलं. कोरोना विषाणूचं हे नवं रुप भारतात आणि युकेमधे आढळलेल्या प्रकारांचं मिश्रण असून त्याचा प्रसार हवेमार्फतही झपाट्याने होतो असं त्यांनी सांगितलं. याबाबतची माहीती आणि आकडेवारी लौकरच जाहीर करु असं ते म्हणाले. व्हिएतनामने गेलं वर्षभर कोविडशी यशस्वी झुंज दिली असून तिथे गेल्या एप्रिल पासून या नव्या प्रकाराचा प्रादुर्भाव झाला आहे. आतापर्यंत तिथे कोविडचे ४७ बळी गेले आहेत. दरम्यान व्हिएतनाममधे आढळलेल्या नवीन प्रकाराची तपासणी अद्याप जागतिक आरोग्य संघटनेनं केलेली नाही, त्यावर काम चालू आहे,असं संघटनेच्या कोविड कार्यगटाच्या प्रमुख मारिया वान केर्खोव यांनी सांगितलं.