नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडप्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा देण्याचं धोरण कायम असल्याचा निर्वाळा नीती आयोगाचे सदस्य डॉ. V K पॉल यांनी दिला आहे. कोव्हीशिल्ड लशीची एकच मात्रा देण्यात येणार असल्याच्या वृत्ताचं त्यांनी खंडन केलं.
कोव्हीशिल्डची पहिली मात्रा घेऊन झाल्यावर १२ आठवड्यांनी दुसरी मात्रा घ्यावी. तर कोव्हॅक्सिनच्या दोन मात्रांमधे ४ ते ६ आठवड्यांचं अंतर राखलं पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं.
दोन लशींचं मिश्रण करण्याबाबत विविध देशांमधे अद्याप संशोधन सुरु आहे, मात्र भारतानं सध्याचं धोरण कायम ठेवलं आहे. सध्याच्या धोरणानुसारच लस घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं.