नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीच्या जागतिक संकटात भारतीय वैज्ञानिकांनी केलेल्या अभूतपूर्व कामगिरीची प्रशंसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. भारतीय वैज्ञानिकांनी अवघ्या वर्षभरात लस निर्मिती, ऑक्सीजन आणि चाचणी उपकरणं, विषाणूंपासून संरक्षण देणारी उपकरणं तयार केली. या कामाचा आवाका आणि वेग अद्वितीय आहे, असं मोदी म्हणाले.

सर्वच क्षेत्रात स्वयंपूर्णतेचं उद्दिष्ट देशाला गाठायचं असून त्यात विज्ञान तंत्रज्ञानाचा सहभाग अत्यावश्यक आहे असं त्यांनी म्हटलं आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या बैठकीला आज ते संबोधित करत होते.

औद्योगिक प्रगतीची नाळ विज्ञान तंत्रज्ञानाशी जोडली गेली पाहिजे असं सांगून ते म्हणाले की हवामानबदला सारखी आव्हानं पेलायला वैज्ञानिकांनी सज्ज झालं पाहिजे.