पिंपरी : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापौर राहुल जाधव यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, विधी समिती सभापती अश्विनी बोबडे, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, शिक्षण समिती सभापती मनिषा पवार, नगरसदस्य राजेंद्र गावडे, केशव घोळवे, नामदेव ढाके, अमित गावडे, राजू मिसाळ, स्विकृत नगरसदस्य भाऊसाहेब भोईर, प्रेमकुमार नायर, माऊली थोरात, नगरसदस्या सुजाता पालांडे, अनुराधा गोरखे, मिनल यादव, शैलजा मोरे, प्रभाग समिती नामनिर्देशित सदस्य संदिप खाडे, विठ्ठल भोईर, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसदस्य गोविंद पानसरे, शहर अभियंता राजन पाटील, मुख्य लेखा परिक्षक अमोद कुंभोसकर, मुख्य लेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अति. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आयुक्त आशा दुरगुडे, मनोज लोणकर, चंद्रकांत इंदलकर, अण्णा बोदडे, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंदारे, प्रमोद ओंबासे, प्रविण घोडे, देवन्ना गट्टुवार, प्रविण तुपे, संजय खाबडे यांच्यासह विविध पदाधिकारी, नगरसेवक, आदी मान्यवर उपस्थित होते.