नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राप्तिकर दात्यांच्या सोयीसाठी प्राप्तीकरविभागाने नवीन ई फायलिंग पोर्टल आजपासून सुरु केलं आहे. या पोर्टलवर करदात्यांच्या विविध स्रोतातल्या उत्पन्नाची नोंद त्यांना तयार मिळेल.
करभरणा आणि इतर कामकाजासाठी वापरायला अतिशय सोपं तसंच विविध प्रश्न आणि शंकांचं निराकरण करण्याकरता संवादात्मक वापराचा पर्याय देणारं हे पोर्टल आहे.
करभरण्याची नवीन पद्धत येत्या १८ जूनपासून सुरु होणार असून त्याच्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन करणारं मोबाईल अॅपही लौकरच उपलब्ध होणार आहे.