मुंबई (वृत्तसंस्था) : भरड धान्याची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड इथं आयोजित कृषी प्रदर्शनाचं उद्धाटन मुख्यमंत्र्याच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते.

आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाच्या माध्यमातून या धान्यांचं आहारातलं आणि आरोग्य विषयक महत्व नागरिकांना पटवून देण्याची नितांत गरज आहे, त्यादृष्टीनं हे प्रदर्शन हा स्तुत्य उपक्रम आहे, असं ते म्हणाले.  यावेळी केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड, रावसाहेर दानवे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकारमंत्री अतुल सावे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे इत्यादी उपस्थित होते.