मुंबई (वृत्तसंस्था) : निधीच्या कमतरेमुळे कोणत्याही आरोग्यविषयक योजना न थांबवण्याचे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते मुंबईत झालेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. त्यांनी अमरावती, नाशिक, नंदूरबार, पालघर जिल्ह्यातल्या १ लाख ४० हजार मुलांना दिल्या जाणा-या न्युमोनिया लसीकरणासाठी ताबडतोब निधी उपलब्ध करून देण्याचे आदेशही संबंधितांना दिले.

सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये अधिक कर्मचारी आणि डॉक्टर उपलब्ध करून देऊन अधिकाधिक डायलिसिस रूग्णांना सामावून घेण्याचे आदेशही त्यांनी दिले. समजातल्या सर्व घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरवण्यासाठीचं मुलभूत साहित्य तातडीनं पुरवण्यावर भर देण्याचे आदेश ही त्यांनी दिले.