मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ३१५ नवीन कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंत या आजारानं बाधित व्यक्तींची एकूण  संख्या ७ लाख ५५ हजार ९४७ इतकी झाली आहे.  काल तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं मृतांचा एकूण आकडा १६ हजार २४७ वर पोहोचला. सध्या मुंबईत ३ हजार ८४९ कोविड ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७ लाख ३३ हजार ३१८ इतकी आहे. मुंबईत कोविडचे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यावर पोहोचल्याचं मुंबई महानगरपालिकेनं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे.