मुंबई (वृत्तसंस्था) : काही नेते आणि मंत्र्यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट न देण्याचा निर्णय केंद्रीय संसदीय बोर्डानं घेतला होता. प्रदेश भाजपाचा या निर्णयीशी काही संबंध नाही, असं स्पष्टिकरण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलखतीत सांगितलं.
तिकीट वाटपा संबंधीचे सर्व अधिकार केंद्रीय संसदीय मंडळाला आहेत. विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आण प्रकाश मेहता यांना तिकीट नं दिल्यामुळे फडनवीस यांच्यावर टिका झाली होती. या निर्णयांमुळे भाजपाला निवडणुकीत फटका बसल्याचं बोललं जात आहे. बावनकुळेंना तिकीट न दिल्यामुळे पक्षाला विदर्भात फटका बसला, हे मात्र फडनविसांनी मान्य केलं.