पिंपरी : चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्यावतीने फिट इंडिया मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
चिंचवड येथील ब्रम्हचैतन्य सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या याआरोग्य शिबिरात रक्तदाब, मधुमेह लक्षणे, हिमोग्लोबीन तसेच बीएम आय इंडेक्स आदींबाबत तपासणी करण्यात आली. तसेच आरोग्यविषयक सल्ला आणि आहाराबाबतसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिराचा लाभ संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी घेतला. आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वेळोवेळी आरोग्य तपासणी करून व्यायाम, चांगला आहार याबद्दल आपण जागरूक असणे गरजेचे आहे असे मत यावेळी संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस यांनी व्यक्त केले. या आरोग्य शिबिरासाठी डॉ.महेश शिरसाळकर व डॉ. भरत दुधाळ यांनी मार्गदर्शन केले. तर पवन शर्मा यांनी विशेष सहकार्य केले.