नवी दिल्ली : ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे एक उच्च स्तरीय पथक उद्या जम्मू आणि काश्मीरला भेट देणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये नवीन सुधारणा आणि सर्वोत्तम पद्धती सुरु करण्याबाबत चाचपणी करणे हा या भेटीचा उद्देश आहे.
ईशान्य प्रदेश विकास मंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ.जितेंद्र सिंह यांनी अलिकडेच मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आगामी दौऱ्याशी संबंधित विविध मुद्दे आणि घडामोडींबाबत चर्चा केली.
या दौऱ्यात पुढील प्रमुख क्षेत्रांवर भर राहील- शाश्वत उपजीविका आणि समुदाय आधारित तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहचणे, निसर्ग पर्यटन, बांबूची घरे, ईशान्य आणि जम्मू-कश्मीरचे शेतकरी आणि कारागीर यांच्यात आदान-प्रदान कार्यक्रम, ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय द्वारा स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी शोरूम्स, समुदाय आधारित नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, सीबीटीसी मध्ये जम्मू कश्मीरच्या कारागीराना प्रशिक्षण, कौशल्य विकास, सांस्कृतिक प्रदर्शन आणि आदान-प्रदान कार्यक्रम.