देशात कोरोनाचे निर्बंध शिथिल केले असले, तरी दक्ष राहण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे निर्देश

150

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यानं अनेक निर्बंध शिथिल केले असले, तरीही सर्व राज्यांनी दक्ष राहण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे.

राज्यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांची प्रभावी अंमलबजावणी, चाचण्या, देखरेख, उपचार आणि लसीकरण या पंचसूत्रिचं पालन करत रहावे असे निर्देशही गृहमंत्रालयाने दिले आहेत. यासंदर्भात केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्यआ सचिवांना पत्र पाठवलं आहे.

राज्यांनी सद्यस्थिती पाहूनच निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याचा किंवा निर्बंध लागू करण्याचा निर्णय घ्यावा असं या पत्रात म्हटले आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यांनी छोट्या छोट्या प्रतिबंधित क्षेत्रांची उपाययोजना राबवावी अशी सूचनाही या पत्रात केली आहे.