नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या १५ कोटी लाभार्थ्यांना उत्तर प्रदेश सरकार आजपासून मोफत शिधा वाटप करणार आहे. या अंतर्गत राज्य सरकार जून, जुलै आणि ऑगस्ट अशा ३ महिन्यांसाठी ५ किलो अन्न-धान्याचं वितरण करणार आहे.

यामध्ये ३ किलो गहू आणि २ किलो तांदळाचा समावेश आहे. अंत्योदय शिधापत्रिका धारकांना ८० हजार सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या दुकांनांवर या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. हे वितरण या महिन्याच्या अखेरीस सुरु होणार असून राज्य सरकार लाभार्थ्यांना पंतप्रधान गरीब योजनेअंतर्गत कमी दरात साखरेचं देखील वाटप करणार आहे.