नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात दिल्या गेलेल्या कोरोना प्रतिबंधक लशींच्या मात्रांची संख्या ३१ कोटी ५० लाख ४६ हजार ६३८ झाली आहे. काल एकूण ६० लाख १९ हजार ५८ जणांना लस दिली गेली. यामध्ये १८ ते ४४ वर्ष वयोगटातल्या १२ लाख २३ हजारांहून अधिक जणांनी लशीची पहिली मात्रा घेतली तर, या गटातल्या १३ हजारांहून अधिक जणांनी लशीची दुसरी मात्रा घेतली. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात आतापर्यंत २ कोटी २ लाखांहून अधिक जणांनी पहिली मात्रा घेतली असून २३ हजारांहून अधिक जणांनी दुसरी मात्रा घेतली आहे.