मुंबई (वृत्तसंस्था) : पंढरपुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी काळात १७ ते २५ जुलै दरम्यान संचारबंदी लागू करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत.

चंद्रभागा परिसरात कलम १४४ लागू करण्यात येणार असून सोलापूर जिल्ह्यातही या काळात त्रिस्तरीय नाकाबंदी करण्यात येणार आहे. यामुळे परवानगी नसलेल्या भाविकाला या काळात जिल्ह्यात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे यंदाही भाविकांना आषाढी एकादशीला विठ्ठलाचं थेट दर्शन घेता येणार नाही.

तर शासकीय महापूजा, विठ्ठलाशी संतांच्या भेटी गेल्यावर्षीप्रमाणेच करण्यात येणार असून नित्योपचार परंपरेनुसार सुरु ठेवण्यात येणार आहेत. संतांच्या पादुका भेटीदरम्यान मानाच्या पालखी सोहळ्यातील ४० वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. तर वारीसाठीच्या २ बसमध्ये प्रत्येकी २० असे ४० वारकऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.