नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २० पेक्षा जास्त देश कोविन अप्लिकेशनद्वारे त्यांच्या देशात लसीकरण करण्यास उत्सुक आहेत असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केलं. कोविन पोर्टल मुळे झालेली लसीकरणाची यशस्वी वाटचाल भारत ३० जून ला एका जागतिक परिषदेत सर्वांना सांगेल असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. आणि देशाच्या लसीकरण कार्यक्रमावर प्रश्न उठवणाऱ्या लोकांना हे उत्तर आहे असंही ते म्हणाले.