मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य कामगार विमा योजनेचा सभासद असलेल्या कामगाराचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्यास वारसांना निवृत्तीवेतन देण्याची योजना अंमलात आणण्यात आली आहे. २४ मार्च २०२० पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने त्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती योजनेच्या पुणे विभागाचे प्रभारी उपनिदेशक हेमंतकुमार पांडे यांनी दिली आहे. मृत्यू पावलेला कामगार कोरोना निदान झालेल्या दिवसाआधी ३ महिने राज्य कामगार विमा योजनेमध्ये नोंदणीकृत असणं आवश्यक असून ज्या दिवशी कामगाराचा कोरोना अहवाल सकारात्मक त्या दिवशी तो नोकरीत असणं आणि त्याच दिवसापासून मागील १ वर्ष अगोदर ७० दिवसांचे अंशदान भरलेले असणे आवश्यक आहे.