मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ८ हजार ७५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ९ हजार ८१२ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १७९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख २६ हजार ८४७ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ५७ लाख ८१ हजार ५५१ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख २० हजार ८८१ रुग्ण दगावले. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ पूर्णांक ९३ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ टक्के आहे. हिंगोली जिल्ह्यात काल एक रुग्ण कोरोना मुक्त झाला काल जिल्ह्यात दोन नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या जिल्ह्यात ३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सांगली जिल्ह्यात काल ९०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल जिल्ह्यात १ हजार ९८ नवीन रुग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात ८ हजार ५२४ रुग्ण उपचार घेत आहेत. काल या आजाराने २१ रुग्णांचा बळी घेतला. परभणी जिल्ह्यात काल बरे झालेल्या ३४ रुग्णांना घरी पाठवलं. काल ३४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव आले. सध्या जिल्ह्यात २८२ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. काल १ रुग्ण दगावला. नांदेड जिल्ह्यात काल १८ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली. जिल्ह्यात काल सात रुग्णांना कोरोनाची लागण झाली. सध्या १६० रुग्ण उपचाराधीन आहेत. वाशिम जिल्ह्यात काल २७ रुग्णांनी या आजारावर मात केली. काल १६ नवीन रुग्णांची भर पडली. सध्या जिल्ह्यात २७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६१७ रुग्णांनी आपला प्राण गमावला. जालना जिल्ह्यात काल ४० रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात काल ३१ नवीन रुग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात २०४ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. काल तीन रुग्णांचा मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यात काल १ हजार ५ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून, १८ बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.बुलडाणा,जिल्ह्यात काल ५१ रूग्णांनी कोरोनावर मात केली. काल कोरोना बाधीत ३१ रूग्ण आढळले. सध्या ८९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.काल २ रुग्णांचा मृत्यू झाला.