मुंबई (वृत्तसंस्था) :मुंबईत काल शनिवारी दिवसभरात तब्बल १ हजार ९१९ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी पाठवलं. मुंबईत आतापर्यंत ६ लाख ९२ हजार ७८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ६४८ नव्या रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आतापर्यंत रुग्णांची संख्या ७ लाख १९ हजार ६१० झाली असून, मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी ७२३ दिवसांवर आलाय. सध्या ९ हजार १४८ रुग्ण उपचार घेत आहेत. काल १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचा एकूण आकडा १५ हजार ३८३ वर पोचला आहे.