नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक नारायण शंकर तथा नानासाहेब गर्गे यांचं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी नानासाहेब यांची नियुक्ती नाशिक शहर संघचालक म्हणून केल्यावर त्यांनी पंचवीस वर्षे ती जबाबदारी सांभाळली. लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ आणि दीपक मंडळ यांच्या स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग होता. मध्यवर्ती हिंदू सैनिकी संस्थेच्या व्यवस्थापनात त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या.