मुंबई (वृत्तसंस्था) : विदर्भात जागतिक दर्जाचे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स तयार करण्यासाठी तांत्रिक व्यवहार्यता (टेक्नोफिझिबिलिटी) अहवाल तयार करण्याचे निर्देश केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिले असल्याचे विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं.
त्यांनी यासंदर्भात आज प्रधान यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं की, ही चर्चा अतिशय सकारात्मक झाली. प्रधान यांनी तात्काळ या प्रकल्पासाठी टेक्नो फिजिबिलिटी अहवाल तयार करण्यासंदर्भात निर्देश दिल्याबद्दल त्यांनी अतिशय आभारी आहे. या प्रकल्पामुळे विदर्भात अनेक नवे उद्योग येतील, गुंतवणूक आणि रोजगार वाढण्यासाठीही त्यामुळे मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.