नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एएफसी महिला आशिया कप २०२२ ही आशिया खंडातली सर्वात मोठी फूटबॉल स्पर्धा पूढच्या वर्षी २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान राज्यात आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे क्रिडामंत्री सुनील केदार यांनी दिली.

या स्पर्धेची आढावा बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात झाली, त्यानंतर वार्ताहरांशी ते बोलत होते. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे इथे या स्पर्धेचं आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करण्यासाठी विविध यंत्राणांना सूचित करण्यात येईल, असं पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले .या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया,जपान आणि चीन आधीच पात्र ठरले आहेत. इतर संभाव्य सहभागींमध्ये  कोरिया आणि दक्षिण कोरिया यांचा समावेश असणार आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे देखील या बैठकीला उपस्थित होते.