मुंबई (वृत्तसंस्था) :मुंबईत कोरोना प्रतिबंधित लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबवली जात आहे. यामध्ये पहिला डोस घेतल्यानंतरही १० हजार ५०० जणांना कोरोनाची लागण झाली. मात्र, दुसरा डोस घेतलेल्या अवघ्या २६ जणांनाच कोरोनाची लागण झाली. अशी माहिती मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. सध्या लसीकरणाचा वेग वाढला असून दररोज ६० ते ७० हजारावर जणांचे लसीकरण केले जाते आहे. लसींचा पुरेसा पुरवठा झाल्यानंतर रोज दीड लाखांपर्यंत लसीकरण करण्याचा प्रयत्न असेल, असही काकाणी यांनी स्पष्ट केलं.