नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या गेल्या सहा वर्षांच्या काळात भारतानं तंत्रज्ञानाचा अंगीकार करत मोठी मजल मारली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या काळात लोकांच्या जीवनात मोठं परिवर्तन झालं आहे. ते आज डिजिटल इंडिया कार्यक्रमाला सहा वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात बोलत होते. किमान शासन कमाल प्रशासनाचं स्वप्न डिजिटल इंडिया कार्यक्रमामुळे पूर्ण होईल, असं ते म्हणाले.

डिजिटल इंडिया ही आत्मनिर्भर भारताची साधना आणि २१ ल्या शतकातल्या समर्थ भारताचा उद्घोष आहे, असं मोदी म्हणाले. डिजिटल इंडिया किती प्रभावी आहे याचं डिजिलॉकर हे उत्तम उदाहरण आहे. आता त्यात शाळा-महाविद्यालयांची कागदपत्रं, आधार, पॅन, मतदार ओळखपत्र सहज आणि सुरक्षित ठेवता येतात. वैद्यकीय सुविधा देशाच्या विविध भागात पोचवण्यासाठी डिजिटल इंडिया नं महत्वाची भूमिका बजावली असून त्याचा लाभ कोट्यावधी देशवासीयांना होतो आहे. वाहन चालवण्याचा परवाना, जन्माचा दाखला, वीज आणि पाणी बिलं भरणं, अशा अनेक गोष्टी सुलभ आणि गतिमान झाल्या आहेत. कोविड काळात दुर्गम भागातल्या लोकांना इ संजीवनी योजनेचा लाभ मिळत आहे. लसीकरणासाठी कोलिन पोर्टलचा मोठा उपयोग होतोय. पायाभूत सुविधांच्या विकासाचं प्रमाण आणि गती वाढवण्यावर डिजिटल इंडिया मोहिमेनं भर दिला आहे, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.  यावेळी त्यांनी डिजिटल इंडिया घ्या काही लाभार्थ्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधला. त्या महाराष्ट्रातल्या प्रस्ताव बोरगदड यांनी इ-नाममुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळत असल्याचं सांगितलं.