नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात काल दिवसभरात देशात ४४ हजार १११ नवे कोरोना बाधित आढळल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचं हे प्रमाण २ पूर्णांक ३५ शतांश टक्के आहे. कोरोनाबाधितांची एकूण संख्या  ३ कोटी ५ लाख २ हजार ३६२ असून या पैकी २ कोटी ९६ लाख ५ हजार ७७९ रुग्ण बरे झाले आहेत. काल दिवसभरात ५७ हजार ४७७ रुग्ण बरे झाले. देशातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ९७ पूर्णांक ६ शतांश टक्के झालं आहे. काल दिवसभरात ७३८ कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्यानं आतापर्यंतच्या मृतांची एकूण संख्या ४ लाख १ हजार ५० झाली असून मृत्यू दर १ पूर्णांक ३१ शतांश टक्के आहे.