नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुमारे १ हजार ९०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर तसंच व्हिडिओकॉन कंपनीचे प्रवर्तक माजी खासदार वेणुगोपाळ धूत यांच्या विरोधात ईडी, अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आरोपपत्र दाखल केलं आहे.

कोचर यांनी पदाचा गैरवापर करत, दीपक कोचर संचालक असलेल्या नू पॉवर कंपनीला १ हजार ८७५ कोटी रुपये कर्ज दिलं. ते कर्ज बुडीत खात्यात गेलं. फक्त कागदावर असलेली न्यू पॉवर ही कंपनी व्हिडीओकॉन कंपनीची उपकंपनी असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

दीपक कोचर यांनी काळा पैसा वैध करण्यासाठी कर्जाऊ रकमेचा वापर केल्याचा संशय असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.