कर्ज संलग्नता भांडवली अनुदान योजनेला पुनश्च सुरुवात
नवी दिल्ली : केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम मंत्री नितीन गडकरी यांनी एमएसएमई क्षेत्राला विलंबाने होणाऱ्या अनुदान वाटपाच्या समस्येबाबत निराकरण करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील, असे सांगितले. तसेच या क्षेत्राच्या दीर्घकालीन समस्या सोडवण्यात येतील, ज्यामुळे त्यांना जीडीपीतील सहयोग आणि रोजगार निर्मितीसाठी पूर्ण पाठिंबा मिळेल. ते पुढे म्हणाले की, वित्त मंत्रालयाने या क्षेत्राच्या सुदृढतेसाठी विविध बाबींमध्ये पुढाकार घेतला असून यु.के.सिन्हा समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम मंत्रालयाने अलिकडेच आयोजित केलेल्या कार्यशाळेत उपरोक्त विषयासंदर्भात केंद्रीय मंत्री चर्चा करत होते. बँकर्स, मंत्रालयांचे कार्याधिकारी तसेच एमएसएमई क्षेत्रातील विविध भागधारकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.
यावेळी भारत क्राफ्ट हे एमएसएमईचे विपणन पोर्टल लवकरच चालू करण्यात येणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. गडकरी यांनी भागधारकांना विनंती केली की, एमएसएमईच्या समाधान पोर्टलचा आवश्यक डाटा उपयोगात आणण्याची गरज असून यामुळे मुंबई शेअर बाजारावर भागधारक स्वत:ची नावे नोंदवू शकतील. तसेच मंत्रालयाने कंपनी कायदा 2013 अंतर्गत सर्वच कंपन्यांची नोंदणी ज्यांची वार्षिक उलाढाल 500 कोटींपेक्षा जास्त आहे आणि जे सर्व केंद्रीय सार्वजनिक उपक्रम क्षेत्रात येतात, ज्यांची नोंदणी केली असून अशांना ट्रेड रिसिव्हेबल डिस्काऊंटींग सिस्टीम उपलब्ध राहील.