नवी दिल्ली : दहशतवादाला आळा घालण्यासाठी एकत्रित आंतरराष्ट्रीय कृतीचे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या, आर्थिक पाठबळ पुरवणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

कोरिया भेटीदरम्यान, ‘सेऊल संरक्षण संवाद 2019’ मध्ये ते बोलत होते. जगासमोर सध्या संरक्षणविषयक अनेक आव्हाने असून दहशतवाद हे त्यापैकी सर्वात गंभीर आव्हान असल्याचे ते म्हणाले. दहशतवादाविरोधात भारताचे संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर मंचावरुनही नेहमीच द्विपक्षीय प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर सक्रीय सहकार्य राहिल्याचे ते म्हणाले.