नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अरुणाचल प्रदेशातल्या तवांग इथल्या ग्यालवा त्जांगयांग ग्योस्टा क्रीडांगणात साजरा झालेल्या ११ व्या मैत्री दिवस कार्यक्रमाला उपस्थित होते.

‘आपल्या सैन्याला जाणा’ ही मुख्य संकल्पना असलेला हा दिवस तरुणांना सैन्याबद्दल माहिती करुन देणं आणि त्यांना मातृभूमीच्या संरक्षणासाठी सैन्यात दाखल होण्यास प्ररित करणं तसंच सैन्य आणि नागरिक यांच्यात मैत्री वाढावी, या उद्देशानं साजरा केला जातो.

यावेळी राजनाथ सिंह यांनी तवांग युद्ध स्मारक आणि बौद्ध मठालाही भेट दिली. पूर्व सियांग जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील सिसरी नदी पूलाचं उद्धाटन राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे.