नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचं पालन न केल्यामुळे १४ बँकांना आर्थिक दंड ठोठावला आहे. यामध्ये बँक ऑफ बडोदाला २ कोटी, बंधन बँक, महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक, क्रेडिट स्विस बँक, इंडियन बँक, इंडसइंड बँक, कर्नाटक बँक, करून व्यैस्य बँक, पंजाब अँड सिंध बँक, साऊथ इंडियन बँक, जम्मू-काश्मीर बँक, आणि उत्कर्ष लघु अर्थपुरवठा बँक यांना १ कोटींचा दंड ठोठावला आहे, तर स्टेट बँकेला ५० लाखाचा दंड आकारला आहे. या सर्व बँकांना आधी नोटीस जारी केल्या होत्या आणि त्यानंतर खातेनिहाय तपासणी केल्यानंतर ही  कारवाई केल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे.