नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करत असलेल्या ॲ तशी उच्चथलिट्ससोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ऑनलाईनपद्धतीनं संवाद साधणार आहेत. युवा व्यवहार आणि क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर, या मंत्रालयाचे राज्यमंत्री नितिश प्रामाणिक आणि कायदेमंत्री किरेन रिजीजू हे देखील या संवादात सहभागी होणार आहेत. मागच्याच महिन्यात प्रधानमंत्र्यांनी या खेळाडूंच्या तयारीचा आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांच्या प्रशिक्षणासाठी केलेल्या नियोजनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं होतं. मागच्या महिन्याच्या अखेरीस आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधतांना, प्रधानमंत्र्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असलेल्या भारतीय खेळाडूंचं विविध माध्यमातून समर्थन करायचं आवाहन नागरिकांना केलं होतं.