नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोव्हॅक्सीन या स्वदेशी लसीच्या मानवी चाचणी संदर्भातले सर्व दस्तऐवज जागतिक आरोग्य संघटनेला ९ जुलैला सादर केले असल्याचं भारत बायोटेकनं कळवलं आहे. भारत बायोटेकची निर्मिती असलेल्या कोव्हॅक्सीनला अत्यावश्यक परिस्थितीतल्या वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळावी, यासाठी भारत बायोटेकनं अर्ज केल्यानंतर, या लसीच्या चाचण्यांसंदर्भातल्या संपूर्ण तपशीलाची पूर्तता करायची मागणी आरोग्य संघटनेनं केली होती. आता सर्व दस्तऐवजी दिले असल्यानं लसीला लवकरच मान्यता मिळेल, अशी आशा भारत बायोटेकनं ट्विटरवर संदेशातून व्यक्त केली आहे.